जुलैमध्ये UPI मार्फत झाले रेकॉर्ड ब्रेक ट्रांझॅक्शन; पोहोचला 149 कोटींच्या विक्रमी पातळीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना साथीच्या प्रसारामुळे भारतात डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक कॅश ऐवजी ऑनलाईन ट्रांझॅक्शन करण्यास प्राधान्य देत आहेत. हेच कारण आहे की UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये (Unified Payments Interface) जुलै 2020 मध्ये सर्वात जास्त कॅश ट्रांझॅक्शन झाले आहेत. जुलै 2020 मध्ये UPI कडून एकूण 149 कोटी ट्रांझॅक्शन झाले आहेत. या ट्रांझॅक्शनचे एकूण मूल्य 2.91 लाख कोटी रुपये आहे. UPI कडून आतापर्यंतचे हे सर्वात जास्त पेमेंट मूल्य आहे.

जूनमध्ये 2.61 लाख कोटी रुपयांचे ट्रांझॅक्शन झाले
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या आकडेवारीनुसार जून 2020 मध्ये 134 कोटी व्यवहार झाले. ज्याचे एकूण मूल्य 2.61 लाख कोटी होते. जुलै 2019 मध्ये ही आकडेवारी 82.23 कोटी होती आणि त्याची किंमत 1.46 लाख कोटी रुपये होती. जर आपण एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जुलै 2020 मध्ये UPI ट्रांझॅक्शन बद्दल बोललो तर त्यापेक्षा दुप्पट मूल्य वाढले आहे. हा आकडा 2.91 लाख कोटींवर पोहोचला आहे.

एप्रिल-जुलैमध्ये 631 कोटी ट्रांझॅक्शन
आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलै या कालावधीत UPIवरील एकूण ट्रांझॅक्शनची संख्या 631 कोटी झाली आहे. यामध्ये 6.31 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले. 2019-20 या आर्थिक वर्षात UPI मधील ट्रांझॅक्शन 1252 कोटी होते, ज्यांचे मूल्य 21.32 लाख कोटी रुपये होते. 2019-20 या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर वर्षभरात UPI कडून होणाऱ्या ट्रांझॅक्शनची संख्या 1252 कोटी झाली आहे. त्याचे एकूण मूल्य 21.32 लाख कोटी रुपये आहे. एनपीसीआयची स्थापना 2008 साली झाली.

UPI व्यतिरिक्त जुलै 2020 मध्ये इमिडिएट पेमेंट सर्विस (IMPS) व्यवहारातही 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलैमध्ये IMPS मार्फत एकूण 22.2 दशलक्ष ट्रांझॅक्शन झाले. त्याअंतर्गत दोन लाख 25 हजार कोटी रुपयांचे ट्रांझॅक्शन झाले.

2016 मध्ये नोटाबंदीनंतर देशभरात डिजिटल ट्रांझॅक्शनचा कल वाढला आहे. एनपीसीआय देशातील रिटेल पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम म्हणून काम करते. हे रुपे कार्ड, आयएमपीएस, यूपीआय, भारत इंटरफेस फॉर मनी (भीम), आधार, एनईटीसी आणि भारत बिल पे म्हणून काम करते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.