Digvesh Rathi Suspended : अभिषेकला नडला अन सस्पेंड झाला; दिग्वेश राठीवर सर्वात मोठी कारवाई

Digvesh Rathi Suspended
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Digvesh Rathi Suspended। फलंदाजांना नडणारा आणि विकेट मिळताच नोटबुक सेलिब्रेशन द्वारे समोरच्या बॅट्समन डिवचणारा लखनौ सुपरजाईंटचा फिरकीपटू दिग्वेश राठीला मोठा झटका बसला आहे. कालच्या सनरायजर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मासोबतचा वाद दिग्वेश राठीच्या अंगलटी आला आहे. दिग्वेश राठीला बीसीसीआयने एका सामन्यासाठी बॅन केलं आहे. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच मॅच फी पैकी 50 टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. आयपीएल इतिहासात कोणालाही दिली नाही अशी शिक्षा दिग्वेश राठीला देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

काल लखनौ सुपरजाईंट चा सामना सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध होता. या सामन्यात हैद्राबादचा सलामीवीर अभिषेक शर्मा तुफान फॉर्मात होता. अभिषेकने अवघ्या २० चेंडूत ५९ धावांची वादळी खेळी खेळली. अभिषेकच्या या आक्रमक फलंदाजीमुळे लखनौचा संघ विजयापासून खूपच लांब गेला. मात्र दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केलं. अभिषेक शर्माची विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठीने आक्रमकपणे सेलिब्रेशन केले आणि इथूनच वाद निर्माण झाला. दिग्वेश राठीने नेहमीप्रमाणे त्याच नोटबुक सेलिब्रेशन करत अभिषेकला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. हे पाहून अभिषेक शर्मालाही राग अनावर झाला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलीच जुंपली. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी, पंचांनी हस्तक्षेप करून सगळं काही आटोक्यात आणलं.

हे पण वाचा : मुंबईच्या राजाने शब्द पाळला; रोहितने चाहत्याला दिली स्वतःची लॅम्बोर्गिनी

सेलिब्रेशन यापूर्वीही वादात- Digvesh Rathi Suspended

दिग्वेश राठीचं हे सेलिब्रेशन यापूर्वीही वादात आलं आहे. उदाहरणार्थ, मुंबई इंडियन्सविरुद्ध नमन धीरला बाद केल्यानंतरही त्याने असंच केलं, ज्यासाठी BCCI ने त्याला 25% मॅच फीचा दंड आणि एक डिमेरिट पॉइंट दिला. IPL 2025 मध्ये त्याच्या या वर्तनामुळे एकूण पाच डिमेरिट पॉइंट्स झाले. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला न झालेली शिक्षा दिग्वेश राठीला सुनावण्यात आली आहे. दिग्वेश राठीला एका सामन्यासाठी बंदी (Digvesh Rathi Suspended) घालण्यात आली आहे. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच मॅच फी पैकी 50 टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे.

अभिषेक शर्मीलाही दंड बसला –

दुसरीकडे अभिषेक शर्मालाही आर्थिक दंड बसला. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अभिषेक शर्माला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात अभिषेकचा कलम 2.6 अंतर्गत हा पहिलाच लेव्हल 1 गुन्हा होता आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.