दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घेतला मोठा निर्णय; इथून पुढे कोणत्याही…

Deenanath Mangeshkar Hospital
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे (Tanisha Bhise) या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे आणि तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे याना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय. याप्रकरणात दीनानाथ रुग्णालयावर चहुबाजूनी सडकून टीका केली जातेय. याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. ‘यापुढे कोणत्याही रुग्णालकडून अनामत रक्कम ( डिपॉझिट) घेतली जाणार नाही’ , असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत झाला आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलं आहे. हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी याबाबत एक पत्रक जारी केलं आहे. कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा… आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता ोर्चेकर्‍यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली..काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली..काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले.. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली..या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली.. लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला हे सोडून आम्ही आत्मचिंतन केले..झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले.. तरीसुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासात आहोत..असं पत्रात म्हंटल आहे.

जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.