Dinesh Karthik All time Indian XI : दिनेश कार्तिकने निवडली भारताची ऑल टाइम बेस्ट XI; धोनीला वगळलं, कोणाकोणाला संधी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आपली सर्वोत्तम ऑल टाइम बेस्ट XI संघ निवडला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी कार्तिकने खेळाडूंची निवड केली असून यात ५ स्पेशालिस्ट फलंदाज, २ अष्टपैलू, २ फिरकीपटू आणि २ जलदगती खेळाडूंचा समावेश आहे. कार्तिकने आपल्या संघात आजी माजी खेळाडूंचा समन्वय राखला आहे. मात्र महेंद्रसिंघ धोनी आणि सौरव गांगुली या भारताच्या दोन्ही दिग्गज कर्णधाराना त्याने आपल्या संघात जागा दिलेली नाही त्यामुळे क्रिकेटप्रेमी हैराण झालेत. (Dinesh Karthik All time Indian XI)

कसा आहे कार्तिकचा ऑल टाइम बेस्ट संघ –

दिनेश कार्तिकने आपल्या संघात सलामीवीर म्हणून आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि हिटमॅन रोहित शर्माचा समावेश केला होता. या दोन्ही खेळाडूंनी भारताकडून प्रदीर्घ काळ सलामी करून संघाला मोठं यश मिळवून दिले आहे. खासकरून आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर समोरच्या गोलंदाजाला बॅकफूटवर ढकलण्याचे काम रोहित आणि वीरूने करून दाखवलं आहे. मध्यक्रमात द वॉल राहुल द्रविड, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि किंग विराट कोहली या महारथींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भारताची फलंदाजी अतिशय मजबूत दिसत आहे.

यानंतर दिनेश कार्तिकने अष्टपैलू खेळाडू म्हणून सिक्सर किंग युवराज सिंग आणि फिरकीपटू रवींद्र जडेजाची निवड केली आहे. युवराज सिंगने भारतीय क्रिकेटसाठी दिलेलं योगदान आणि 2007 तसेच 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका यामुळे भारताच्या ऑल टाइम बेस्ट इलेव्हन मध्ये त्याचा समावेश तर असतोच. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने सुद्धा मागील १० वर्षात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यानंतर फिरकीपटू म्हणून आर अश्विन आणि अनिल कुंबळे या महान गोलंदाजांना कार्तिकने आपली पसंती दाखवली आहे. तर जलदगती गोलंदाज म्हणून झहीर खान आणि जसप्रीत बुमराहला दिनेश कार्तिकने संधी दिली आहे. तर टर्बोनेटर हरभजन सिंगला १२ व्या खेळाडूच्या रूपात कार्तिकने निवडलं आहे.

अशी आहे कार्तिकची ऑल टाइम बेस्ट XI-

वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अनिल कुंबळे, झहीर खान, जसप्रीत बुमराह, हरभजन सिंग (बारावा खेळाडू)