हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्स कडून पराभव झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दिग्गज विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिक आयपीएल मधून निवृत्त (Dinesh Karthik Retirement) झाला. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूम मध्ये परतत असताना दिनेश कार्तिकने हातात ग्लोव्हज घेऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं. यावरून त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळल्याचे स्प्ष्ट झालं. कार्तिकने आपल्या १६ वर्षाच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ६ संघांकडून क्रिकेट खेळलं … त्यांची आयपीएल कारकीर्द नक्कीच अभिमानस्पद अशीच राहिली आहे.
कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या रोवमन पॉवेलने विजयी धाव घेताच दिनेश कार्तिकने विराट कोहलीला मिठी मारली.. यानंतर इतर सहकाऱ्यांनीही दिनेश कार्तिकला भावनिक निरोप दिला. खरं तर आपल्या निवृत्तीबाबत (Dinesh Karthik Retirement) कार्तिकने स्पष्ट अशी कोणतीही घोषणा केलेली नाही .. परंतु मैदानावरील एकूण ते भावनिक क्षण पाहता कार्तिक पुनः आपल्या मैदानावर पाहायला मिळणार नाही.
६ संघांकडून आयपीएल खेळला- Dinesh Karthik Retirement
दिनेश कार्तिक आत्तापर्यंत एकूण ६ संघांकडून आयपीएल खेळला. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 2011 मध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये गेले. त्यानंतर त्याने मुंबई इंडियन्स कडून दोन हंगाम खेळले. 2014 मध्ये पुनः एकदा तो दिल्लीच्या संघात गेला. त्यानंतर 2015 मध्ये आरसीबीने त्याला विकत घेतलं. 2016 आणि 2017 मध्ये कार्तिक गुजरात लायन्ससाठी खेळला आणि नंतर केकेआर बरोबर चार हंगाम खेळला, कार्तिकने कोलकात्याचे कर्णधारपदही भूषवले होते. यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा तो आरसीबीमध्ये परतला आणि त्याने फिनिशरची उत्तम भूमिका बजावली.
दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये एकूण 257 सामने खेळले ज्यात त्याने 4842 धावा केल्या. यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. कार्तिकचा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या १० खेळाडूंच्या यादीत समावेश आहे. विशेषत: आरसीबीमध्ये सामील झाल्यानंतर कार्तिकचा खेळ आणखी सुधारला आणि फिनिशर म्हणून तो नावारूपाला आला. या मोसमात त्याने 15 सामन्यात 326 धावा केल्या. अखेरच्या षटकात फलंदाजीला येऊन आक्रमक शॉट मारण्यात कार्तिक माहीर आहे. त्याने अनेकदा आरसीबीला संकटातून बाहेर काढत मोठी धावसंख्या रचून दिली आहे.