Dinner Habits : रात्रीचे जेवण नीट पचत नाही? तर फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स, होईल सकारात्मक परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dinner Habits) अख्ख्या दिवसाचा क्षीण घेऊन संध्याकाळी दमून, वैतागून घरी आल्यानंतर मरणाची भूक लागलेली असते. दिवसभरात विविध कामे करताना आपल्या शरीरातील एनर्जी केव्हा संपते ते आपलं आपल्याला कळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा कामावरून घरी आल्या आल्या भूक लागल्याचे जाणवते. रात्रीचे जेवण हे आपल्या दिनचर्येतील लास्ट मील असते. त्यामुळे रात्रीचे जेवण आपल्या आरोग्यावर विशेष परिणाम करत असते. म्हणूनच, रात्रीच्यावेळी हलका आहार घ्यावा असे सांगितले जाते.

मात्र, भुकेच्या तडाख्यात आपण गरजेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करतो. अनेकदा बाहेर जेवायला गेले असताना जिभेला आवडतंय म्हणून जास्त खाल्लं जात. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर अत्यंत गंभीर स्वरूपात होत असतो. (Dinner Habits) अशा आहारामुळे वजन वाढणे, अपचन, रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढणे आणि इतर जुनाट आजरांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रात्रीच्या जेवणाबाबत काही महत्वाच्या सवयी अंगी लावून घेणे गरजेचे असते. या सवयी कोणत्या? ते जाणून घेऊ.

सकारात्मक परिणामांसाठी फॉलो करा ‘हे’ डिनर हॅबिट्स (Dinner Habits)

1. रात्रीचे जेवण हे सूर्यास्तापूर्वी किंवा शक्यतो संध्याकाळी ७ च्या आधी करावे. जुने लोक सांगायचे की, रात्रीचे जेवण लवकर करणे आपल्या पचन आणि चयापचयसाठी चांगले असते. विज्ञानाने देखील या गोष्टीला समर्थन दिले आहे. त्यामुळे हे सुनिश्चित करा की, रात्रीच्या वेळी तुमचा आहार लवकर होईल. यामुळे जेवण पचवण्यासाठी शरीराला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही.

2. तुम्ही रात्री काय जेवता याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. (Dinner Habits) त्यामुळे रात्रीचे जेवण शक्यतो हलके असावे. तुमच्या जेवणात तेलकट आणि तळलेले पदार्थ नसतील याची काळजी घ्या. अशा पदार्थांमुळे पित्त आणि ऍसिडिटीच्या समस्या होऊ शकतात.

3. रात्रीच्या जेवणात शक्यतो सुपसारखे पदार्थ असावेत. (Dinner Habits) यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे हायड्रेशन मिळेल. जे पचनास मदत करते. हे सूप विविध भाज्यांसोबत तयार केल्यास अधिक पोषण आणि फायदे मिळतील.

4. हे सुनिश्चित करा की, तुमच्या रात्रीच्या आहारात अॅनिमल प्रोटीन नसेल. कारण, असा आहार पचविण्यासाठी खूप जड असतो आणि त्यामुळे तुमच्या पचनक्रियेला खूप कष्ट पडू शकतात. यामुळे निरोगी गट फ्लोरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. (Dinner Habits)

5. रात्रीच्या जेवणात कोणत्याही प्रकारचे ब्रेड किंवा पाव पाहू नका. असे पदार्थ पचायला जड असतात. शिवाय याचे पचन नीट न झाल्यामुळे चयापचय क्रियेत अडचण येऊ शकते. यामुळे मानसिक आरोग्य अस्थिर होऊन चलबिचल निर्माण होते. ज्यामुळे चांगली झोपही येत नाही.

6. रात्रीच्या आहारात पौष्टिक आणि हलके जेवण घ्या. पण हे जेवण घाईघाईने आवरते घेऊ नका. तर शांत चित्ताने आणि मन लावून करा. प्रत्येक घशावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने तुमचा आहार व्यवस्थित पचेल. (Dinner Habits)