दीपक मानकर अखेर पोलिसात हजर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी महापौर दीपक मानकर आज पुणे पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून लागलीच शिवाजी नगरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून एका भूखंड खरेदी प्रकरणात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी या दोघांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मानकर यांच्यावर आहे. मृत्यू पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जितेंद्र जगताप यांनी मानकर यांचे नाव लिहील्याने त्यांच्या न्यायालयात केस चालू आहे. जितेंद्र जगताप यांनी दीपक मानकर यांच्या नावाची चिठ्ठी लिहून रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या केली होती. ही घटना २ जून २०१८ रोजी घडली होती.

दीपक मानकर यांनी पुणे सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अटक पूर्व जमीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आणि त्यांना १० दिवसात पोलिसांना स्वाधीन होण्यास सांगितले होते. त्यानुसार आज मानकर पोलिसांसमोर शरण आले. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात विनोद भोळे अमित एनपुरे, सुधीर सुतार, निशांत कांबळे आणि अनिल पवार यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment