पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या ड्रायव्हरला कोरोना, आयुक्त होम क्वारंटाईन  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, सांगली सातारा या जिल्ह्यांचे प्रशासकीय पातळीवर नियोजन करणारे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या वाहन चालकाला करोनाची लक्षणे आढळून आल्याने डॉ. म्हैसेकर यांना ‘होम क्वारंटाइन’ करण्यात आले आहे. डॉ. म्हैसेकर यांची तपासणी करण्यात आली असून, नमुना अहवाल येईपर्यंत ते घरातून कामकाज पाहणार आहेत.

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या ड्रायव्हरने करोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. यांनतर दीपक म्हैसेकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी दररोज बैठका घेणे, घटनास्थळाची पाहणी करणे, मंत्र्यांच्या दौऱ्यांना उपस्थित राहणे यांसारखी कामे डॉ. म्हैसकर करत आहेत. त्यांच्या वाहनाच्या चालकाची तपासणी करण्यात आली असता, अहवाल सकारात्मक आला आहे.

सध्या वाहन चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवाल येईपर्यंत डॉ. म्हैसेकर हे घरून काम करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, करोना नियंत्रणाच्या सर्व बैठका दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. या बैठकीला अनेक पदधिकारी उपस्थित होते. त्यातबरोबर पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांचे वाहनचालक सतत एकमेकांच्या संपर्कात येत असतात. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Comment