कोरोनाला हरवण्यासाठी विभागीय आयुक्तांचा मास्टरप्लॅन; कराडकरांसाठी ‘हे’ मोठे निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. कराड कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी कराड ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी म्हैसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत इतर अधिकाऱ्यांची कराड विश्रामगृह येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हा प्रशासनाला काही महत्वाच्या सूचना दिल्या.

सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ११६ कोरोना केस सापडल्या आहेत. त्यातील ८६ केस या एकट्या कराड तालुक्यात आहेत. तेव्हा कराड हे खऱ्या अर्थाने कोरोना हॉटस्पॉट बनले आहे असे म्हैसकर म्हणाले. दिवसभराच्या पाहणीनंतर म्हैसकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा संवाद साधला यावेळी ते बोलत होते. आयुक्त म्हैसकर यांनी कराड येथील कोरोना विषाणूला हरवनासाठी जिल्हा प्रशासनाला एक मास्टर प्लॅन दिला आहे. तसेच अनेक सूचना देखील केल्या आहेत.

जिल्ह्यात सध्या एकूण ९६ एक्टीव्ह कोरोना केस आहेत. २० जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे तर २ जणांचा कोरोनामुळे जिल्ह्यात बळी गेला आहे. सुरवातीच्या केसेस मध्ये रुग्ण बाहेरून आलेले होते. मात्र सध्या कोरोना इथल्या लोकांमध्ये पसरला असल्याचे दिसत आहे. सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडले असले तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे अशी माहिती म्हैसकर यांनी दिली आहे.

आयुक्त म्हैसकर यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे –
– कराड येथील मार्केट प्लेस शासन निर्देशाप्रमाणे काही दिवस बंद ठेवाव्या लागतील. लोकडाऊन संपल्यानंतर किंवा परिस्थितीत पूर्ण सुधारणा झाली तर जिल्हाधिकारी त्याबाबत निर्णय घेतील.
– कराड उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णदुसरीकडे हलवले जातील. आणि कॉटेज हॉस्पिटल पूर्णपणे नॉन कोविड केले जाईल. आणि तिथे त्याच्या जागी दुसरे कोविड केअर सेंटर निर्माण केले जाईल.
– कृष्ण हॉस्पिटल येथे क्रिटिकल कोविड रुग्णांवर उपचार केले जातील.
– scw हेल्थ केअर वर्कर्स मधून जे ट्रान्सफर झाले त्यातून हे रुग्ण वाढले आहेत. मात्र याला थांबवण्यात आपण यशस्वी होऊ
– १७ तारखेपर्यंत वाट पाहायची कि काही भाग ओपन करायचा याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय घेतला जाईल.
– उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या तीन राज्यांनी आपल्याला त्या त्या राज्यांतील महाराष्ट्रात अडकलेले नागरिक माघारी पाठवण्यासाठी संमती दिलेली आहे.
तेव्हा या राज्यात रेल्वे सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. उद्या संध्याकाळी एक रेल्वे सोडण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडू केला जात आहे. ११०० ते १२०० प्रवासी झाल्यानंतर रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.
– सोशल डिस्टंसिंग मेंटेन करावं. जोपर्यंत या आजारावर लस निघत नाही तोवर नागरिकांना काळजी घायवयाची आहे. आपल्या घरातील जेष्ठांची काळजी घ्या. आज्जी आजोबा, आई वडील यांची काळजी हत्या. त्यांना जपायची जबाबदारी आपण सर्वांसाची आहे. ज्यांना डायबेटीस आहे यांनी काळजी घ्यावी. जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशी केंद्र शासनाचे निर्देश आहेत.
– आपला जिल्हा रेड झोन मध्ये आहे त्यामुळे सर्वांनी आरोग्य सेतू अप डाउनलोड करा. ते बंधनकारक आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2954928337948769/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment