कराड | सशक्त समाज निर्माण करण्यात आणि राष्ट्र उभारणीत शिक्षकांचा वाटा महत्वाचा असतो. रोटरी क्लब अॉफ कराड ने शनिवार दि.६ अॉक्टोबर २०१८ रोजी शिक्षक म्हणुन विशेष काम करणार्या आणि आदर्श विद्यार्थी घडवून राष्ट्र उभारणीत सिंहाचा वाटा उचलणार्या खास शिक्षकांना नेशन बिल्डर अॅवाॅर्ड देऊन सन्मानित केले. यावेळी यशवंत हायस्कुल, कराड येथील दिपक पाटील (डी.डी. पाटील) यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
दिपक पाटील हे रयत शिक्षण संस्थेमधे शिक्षक असून त्यांच्या आजवरच्या विशेष कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पाटील हे अटल टिंकरिंग लॅब चे प्रमुख असून गणित विषयाचे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लावण्यास त्यांचा पुढाकार असतो.
यावेळी एकुण १८ शिक्षकांना रोटरी इंडिया लिटरसी मिशन अंतर्गत नेशन बिल्डर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आले. यामधे श्री माळी एस के (टिळक हायस्कूल कराड), श्री कुलकर्णी व्ही जी (सरस्वती विद्यामंदिर कराड), श्री बुराडे आर बी (श्री शिवाजी विद्यालय कराड), साै.देसाई व्ही आर (विठामाता विद्यालय कराड), श्री पाटील डी डी (यशवंत हायस्कूल कराड), श्री गावीत आर टि (दिगंबर काशीनाथ पालकर माध्यमिक शाळा कराड), साै.कोळी एम ए (कराड नगरपरिषद शाळा नं.१२, साै. पाटील एस के (जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वहागाव), श्री बाबर एस यू (आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी), साै.पानवळ एम बी (माध्यमिक विद्यामंदिर सदाशिवगड, श्री देसाई एस एम (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवारे), कु.माने एसटी (रोटरी माध्यमिक विद्यालय मलकापूर), श्री शिरतोडे एम पी (श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळा मलकापूर), श्री पोटे आर ए (हौसाई कन्याशाळा मलकापूर), साै. जाधव एस व्ही (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालवडे), साै.कदम जे जे (जागृती विद्यामंदिर बनवडी), श्री पाटील डी एस (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येणके), श्री साळुंखे एन टी (डॉ. द शि एरम मुकबधीर विद्यालय विद्यानगर) आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पहिली, खास शिक्षकांसाठी शिक्षकांची सुंदर हस्ताक्षर स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. तसेच सातारा येथील अपंग, गरीब व गरजू व्यक्ती श्री. मुजुमले यांना यावेळी अपंगाची तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी शिक्षण मंडळ, कराड चे सचिव मा. श्री. चंद्रशेखर देशपांडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या या नाविन्यपुर्ण हस्ताक्षर स्पर्धेसाठी मा. साै. पी. डी. कुलकर्णी या परिक्षक म्हणुन लाभल्या होत्या. या काैतुक सोहळ्याला व्यासपिठावर रोटरी क्लब कराडचे अध्यक्ष रो. डॉ. राहुल फासे, सचिव रो. प्रबोध पुरोहित, उपाध्यक्ष रो. सागर जोशी, NBA चे प्रोजेक्ट चेअरमन रो. वैभव कांबळे, हस्ताक्षर चे प्रोजेक्ट चेअरमन रो. राहुल पुरोहित हे उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबचे बहुसंख्य सदस्य व इनरव्हील क्लब, रोट्रॅक्ट क्लब चे अध्यक्ष, सचिव, सदस्य हेही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते. या समारंभाची प्रस्तावना अध्यक्ष रो. डॉ. राहुल फासे यांनी केले, सुत्रसंचलन रो. किरण जाधव यांनी केले व आभार सचिव रो. प्रबोध पुरोहित यांनी मानले.




