फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठापासून चपात्या करत असाल तर सावधान; शरीरासाठी आहे हानिकारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चपाती- भाजी हा भारतीयांच्या जीवनातील मुख्य पदार्थ आहे. चपाती- भाजीशिवाय कोणाचेही जेवण पूर्ण होत नाही. परंतु चपात्या अगदी हलक्या फुलक्या, मऊ होण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. अनेक लोक हे फ्रीजमध्ये पीठ मळून ठेवतात आणि नंतर त्यापासून चपात्या बनवतात. परंतु फ्रीजमध्ये ठेवलेल्या बनवलेल्या पिठाच्या चपात्यांपासून तुमच्या आरोग्याला समस्या निर्माण होऊ शकते.

अने वेळा आपण चपातीचे पीठ मळून घेतो आणि नंतर ते पीठ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवतो. नंतर त्या पिठापासून चपात्या करून खातो. परंतु अशा चपात्या तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठामधील पोषकतत्व कमी होतात. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये जास्त वेळ राहिल्याने त्यातील जीवनसत्व आणि मिनरल्स देखील कमी होतात. याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे फ्रिजमधील गॅसचा त्या पिठावर परिणाम होतो. आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला देखील धोका निर्माण होतो.

मळलेले पीठ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यात फंगस निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा पिठापासून बनवलेली चपाती खाल्ली, तर त्यापासून पोट दुखी, उलट्या आणि जुलाब्यांसारखे आजार होऊ शकतात. त्याचप्रमाणे ताज्या पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव चांगली लागते. तर फ्रीजमध्ये बनवलेले पिठापासून बनवलेल्या चपात्यांची चव वेगळी लागते. फ्रिजमध्ये ठेवलेला पिठापासून बनवलेल्या चपात्या या पचायला देखील कठीण असतात. त्यामुळे तुमच्या पोटात गॅस ऍसिडिटी त्याचप्रमाणे पचनाशी संबंधित अनेक समस्या देखील उद्भवू शकतात.

मळलेल्या पिठामध्ये बॅक्टेरियांची वाढ खूप लवकर होते. जर हे पीठ तुम्ही जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवले, तर यामध्ये वेगाने बॅक्टेरिया वाढतात. जे आपले आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे नेहमी पीठ मळून झाल्यावर लगेच त्याच्या चपात्या करा. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे संतुलित राहतात. आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. पीठ मळून झाल्यावर तुमचे हात आणि भांडी स्वच्छ करा. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका कमी होतो.