साक्री तालुका युवासेना प्रमुखांची युवासेना संस्थापक सदस्य पवन जाधव यांच्यासोबत मुंबई येथे विविध विषयांवर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्यात पूर्वापार शिवसेनेचा प्रचंड मोठा दबदबा राहिला आहे.अलीकडे युवासेनेला देखील स्थानिक युवकांनी खूप मोठ्याप्रमाणावर स्वीकारलं असल्याचं चित्र आहे.त्यामागे पक्ष नेतृत्वाची आणि स्थानिक नेतेमंडळीची साथ तर आहेच.पण युवा सेना वाढीमध्ये अनेक बिनीच्या शिलेदारांची खूप मोलाची साथ आहे.त्यातलचं एक नाव म्हणजे चेतन उर्फ बाळासाहेब देवरे.देवरेंनी नुकतीच युवासेना संस्थापक सदस्य पावन जाधव यांची मुंबईत भेट घेऊन युवासेना संघटनात्मक बांधणी प्रश्नावर विविध विषयांवर चर्चा केली.

यावर हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना देवरे म्हणाले की “माझ्या प्रत्येक कामात मला अनेक लोकांचे मार्गदर्शन लाभत असते.त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते पवनजी जाधव, राकेशजी देशमुख यांचं. या लोकांसोबत मी वेळोवेळी विविध विषयांवर चर्चा करत असतो.त्यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याच गोष्टी सोप्या होतात असा माझा अनुभव आहे.आमची आताची भेट सुद्धा तशीच काहीशी होती.अनेक विषयांवर मुक्त संवाद झाला.संघटनात्मक बांधणी या विषयावर आम्ही बराच वेळ चर्चा केली.अगदी छान वाटलं भेटून.या पुढे देखील त्यांचं मार्गदर्शन घेतच राहू.असं देवरे म्हणाले.

चेतन देवरे हे तसे पूर्वापार बाळासाहेबांच्या विचारावर आणि शब्दावर प्रेम करणारे.सिव्हील इंजिनियरिंग करून फक्त समाजकारण करायचं असा त्यांचा मानस होता.पण स्थानिक नेते विशाल देसले यांच्या संपर्कात आले आणि पक्षाशी जोडले गेले.गेल्या पाच – सहा वर्षांपासून ते पक्षांचं काम करत आहेत. नुकतीच सहा महिन्यांपूर्वी त्यांची साक्री तालुका युवासेना अध्यक्षपदी निवड झाली आहे.पूर्वी साक्री तालुक्यात युवासेनेला मिळणारा जनाधार देवरे यांच्या काळात दुपटीने वाढला असल्याचे चित्र आहे.

You might also like