गोकुळ दुध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ,

गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेनेच्यावतीन करण्यात आली. पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेन दिलाय.

कोल्हापूर जिल्ह्यतल्या गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता पशुखाद्याच्या पोत्यामागे शंभर रुपये दरवाढ केली आहे. दूध उत्पादन खर्चाचा विचार करता, शेतकऱ्याला ही दरवाढ परवडणारी नाही. त्यामुळं पशुखाद्याची दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पशुखाद्याची दरवाढ मागे न घेतल्यास टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी, गोकुळचे संचालक मंडळ वारेमाप खर्च करत आहे, मात्र यामध्ये काटकसर केली तर, दूध उत्पादकांना अधिकचा दर मिळेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ मल्टिस्टेट ला काही दिवसांपूर्वी विरोध केलाय आता त्यांनी गोकुळच्या चुकीच्या कारभाराबाबतही लक्ष घालण्याची मागणी यावेळी विजय देवणे यांनी केली.

Leave a Comment