हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Disneyland In Navi Mumbai – नवी मुंबईत 200 हेक्टर जागेवर डिस्नेलँडच्या धर्तीवर एक जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहे. ‘मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हब’च्या अंतिम आराखड्यात हा महत्त्वपूर्ण प्रकल्प समाविष्ट करण्यात आलेला आहे. या थीम पार्कमध्ये मुलांना मिकी माऊस, मिनी माऊस, डोनाल्ड डक आणि गुफी यांसारख्या त्यांच्या आवडत्या कार्टून पात्रांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या राईड्सचा अनुभव घेता येणार आहे, जे विशेषतः मुलांसाठी आकर्षक ठरणार आहेत.
थीम पार्कचे बांधकाम (Disneyland In Navi Mumbai)–
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) तयार करण्यात आलेल्या ‘एमएमआर ग्रोथ हब’च्या अंतिम आराखड्यानुसार, नवी मुंबईच्या दक्षिणेला या थीम पार्कचे बांधकाम होईल. त्यात (Disneyland In Navi Mumbai) रिसॉर्ट्स, ऍनिमेशन स्टुडिओ, राईड्स झोन आणि वॉटर पार्कसारख्या सुविधांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणे आणि नवी मुंबईला एक जागतिक दर्जाचे आकर्षण प्रदान करणे आहे. सध्याच्या स्थितीत एमएमआर क्षेत्रातील विविध रिसॉर्ट, थीम पार्क आणि वॉटर पार्क्स आहेत, पण हे प्रकल्प सरकारी मदतीने साकारला जात असलेला पहिला मोठा प्रकल्प ठरणार आहे.
‘मुंबई आय’ प्रकल्प –
यामधील अजून एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘मुंबई आय’ प्रकल्प. लहान मुलांना आकर्षित करणारा हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आता प्रत्यक्षात आणला जाणार आहे.