Whatsapp च्या नवीन Privacy Policy बद्दल तुम्ही असमाधानी आहात? असा Delete करा तुमचा सर्व Data

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेगवेगळ्या मोफत आणि आकर्षक सुविधा देऊन खूप थोड्या काळात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेले व्हाट्सअप ने बदललेल्या ‘प्रायव्हसी सेटीन्ग्स’मुळे गेल्या काही दिवसात व्हाट्सअप खूप चर्चेमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात वापरकरते या प्रायव्हसी पॉलिसीचा विरोध करत आहेत. यानंतर अनेक वापरकर्त्यांनी व्हाट्सअपला निरोप देऊन इतर मेसेंजर वर नोंद करून तिकडे गेले आहेत. त्यामुळे येत्या काही काळात आपला डाटा आणि आपली प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वापर करते व्हाट्सअप सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर तुम्ही ही व्हाट्सअप सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर खालील पद्धतीने व्हाट्सअप डिलीट करून आपण आपला डेटा सुरक्षित ठेवू शकता.

फक्त व्हाट्सअप अनइनस्टॉल केल्याने आपला डाटा सुरक्षित राहणार नाही व व्हाट्सअपचे अकाउंट बंद होणार नाही त्यासाठी व्हाट्सअपला डिलीट करायला करावे लागेल हे डिलीट करण्याची एक खास पद्धत असून ती पद्धत खालीलप्रमाणे,
– प्रथम आपल्या फोन मधील व्हाट्सअप उघडा,
– व्हाट्सअप उघडल्यानंतर उजवीकडे वरती तीन बिंदू आहेत त्या वरती टॅप करा
– त्यानंतर विविध पर्यायातील त्यामध्ये ‘तुमच्या अकाउंट’ पर्यायावर क्लिक करा
– त्यामध्ये नंतर ‘डिलीट माय अकाउंट’ असा पर्याय असेल त्यावर टॅप करा
– त्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यावर आपला नंबर प्रविष्ट करून परत एकदा डिलीट माय अकाउंट वर क्लिक करा व्हाट्सअप नंतर तुम्हाला कारण विचारल ते कारण देऊन तुम्ही पुन्हा एकदा डिलीट माय अकाउंट वर टॅप करा. असे असे केल्याने तुमच्या अकाउंट डिलीट होईल व व्हाट्सअप तुमच्या फोन मधून कुठलाही डेटा घेऊ शकणार नाही.

https://t.co/xzzWpcau6L?amp=1

व्हाट्सअपने नवीन वापरकर्त्यांसाठी 5 जानेवारी रोजी नवीन प्रायव्हसी लागू केले आहेत. या प्रायव्हसी मध्ये वापरकर्ता ज्या गोष्टी करेल त्याची माहिती घेण्यात येईल. याशिवाय पेमेंट केल्यास त्याची माहिती. सोबतच, मोबाईल डिवाइस आणि तुमचे लोकेशन सुद्धा वेळोवेळी रेकॉर्ड केले जाईल आणि ह्या पॉलिसीला तुमचा नकार असेल तर तुम्ही व्हाट्सअप वापरू शकणार नाहीत. म्हणजेच, तुम्हाला तुमची प्रायव्हसी व्हाट्सअप सोबत शेअर करायची नसेल तर तुम्हाला व्हाट्सअप सोडायला लागेल.

https://t.co/0zbWkWZdNH?amp=1

https://t.co/LPjqevnEBS?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment