पाटणला नवरात्रीत पाटणकर परिवारांकडून निराधार महिलांना ब्लॅंकेट व चटईचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | येथील समर्थ सुहास चॅरीटेबल ट्रस्ट पाटण व शिवाजी उदय मंडळ पाटण यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही पाटणकर परिवाराकडून नवरात्रीनिमित्त नऊ निराधार मातांना ब्लॅंकेट व चटई याचे वाटप करण्यात आले. नवरात्रीत अनोख्या पध्दतीने निराधार महिलांचा सन्मान केल्याने काैतुक होत आहे.

शिवाजी उदय मंडळात पाटण परिवाराचे सदस्य इमतियाज शेख (नालबंद) यांच्या माध्यमातून शहरातील नवरात्र निमित्त नऊ निराधार मातांना ब्लॅंकेट व चटई याचे वाटप करण्यात आले. यावेळी निराधार असणाऱ्या लोकांना मायेची चादर समाजसेवक नितीन पिसाळ यांच्या हस्ते एसटी स्टँड पाटण येथे वाटप करण्यात आले. तसेच शिवाजी उदय मंडळ पाटण येथे याप्रसंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी बंडा फाटक, गुंजन खांडके, विजय महादर, मिलिंद पवार, सुरेश सपकाळ, नारायण हावरे, विकास ढवळे, भानुदास जाधव, संजय टोपले, गणेश कांबळे, गणेश नायकवडी, सुनील चौधरी, अविनाश खांडके, बाबुकाका शेंडे तसेच सर्व मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

नितीन पिसाळ म्हणाले, नवरात्रीत प्रत्येकाने निराधार महिलांना सन्मान करून नवा आदर्श निर्माण करावा. स्त्री शक्ती ही समाजात पुढे येण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ नऊ दिवस सन्मान न करता प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Leave a Comment