कराड | मंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे पाटण शाखेतील कर्जदार सभासद अपघातात मृत्यू पावले. त्याच्या कर्जाला विमा संरक्षण असल्याने कर्ज भरून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली. आनंदराव चव्हाण पंतसंस्थेचचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
पाटण शाखेतील सभासद मुबारक चांद शेख (रा. पाटण) यांचे मुंबई येथे अपघाती निधन झाले. त्यांनी संस्थेतून कर्ज घेतले होते. त्या कर्जास संस्थेने विमा संरक्षण दिले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर संस्थेने त्यांच्या विमा रकमेचा क्लेम करून कर्ज रक्कम भरणा केली. तसेच शिल्लक राहिलेल्या विमा रकमेचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना वितरण करण्यात आला. मुबारक शेख यांचे कर्ज 50 हजार रूपये होते. तर विमा संरक्षण 1 लाख 50 हजार रूपये होते. यावेळी पाटण सल्लागार समितीचे सदस्य महिपती जाधव, तुषार पवार, शाखाप्रमुख नंदकुमार पाटील, कॅशिअर भूषण घाडगे, लिपिक अनिता घाडगे, स्वाती मोळावडे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
उंब्रज शाखेत ठेव पावतीचे वितरण
मुंद्रुळकोळे येथील आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पंतसंस्थेच्या उंब्रज शाखेच्या 21 व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा झाला. संस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. यावेळी सभासद सत्यवान मोहिते, शाखा उंब्रज शाखाप्रमुख रोहित सुनील माने, कॅशिअर सुनिल कदम, जयश्री शितोळे, उमेश पालकर यांच्यासह कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.