जीवनस्पर्श संस्थेमार्फत गरीब व गरजू लोकांना फूड पॅकेटचे वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्याबरोबरच कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांचे देखील हाल होत आहेत. लॉकडाऊन असल्याने सर्व बंद आहे त्यामुळे त्यांच्या जेवणाची सोय होत नाही. गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांच्यासोबत असतात मात्र त्यांची कुठलीही सोय होत नाही.

या काळात अनेकांना मदतीची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन जीवनस्पर्श या संस्थेमार्फत गरीब व गरजू लोकांसह, रुग्णालयातील नातेवाईकांना, घाटी व घाटीच्या आजूबाजूच्या परिसरात फूड पॅकेज वाटप करण्यात येत आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून ही संस्था गरजू लोकांना अन्न वाटण्याचे काम करत आहे. आणि यापुढेही फूड पॅकेज वाटप करणार असल्याची माहिती संस्थेतील सदस्यांनी दिली. हे पॅकेट वाटप करताना विराज शेजुळ, मनिषा गायकवाड, मीनाक्षी गायकवाड, मधुकर काळे, कांता काळे, किरण गायकवाड, सुनील नाडे, प्रकाश उमके, विशाल अर्सुड,अशोक शिंदे व अमित नवगिरे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment