महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर, जावली अशा तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. यातील या दुर्गम गावात जंगलातील पायवाटेने क्षेत्र महाबळेश्वर गावातील तरुणांच्या मदतीने मदत पोचवत आहे. यातील महाबळेश्वर येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पाहणी केली. यावेळी आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी आढावा बैठकही घेण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, राजेंद्रशेठ राजपुरे, प्रविण भिलारे,नारायण गोलप उपस्तीत होते. दरम्यान महाबळेश्वर येथील नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांचेवर सोपविली आहे. ते उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत हे काम पाहत आहेत.

संबंधित यंत्रणा पंचनामे, आणि तात्पुरत्या डागडुजी, रस्ते धुरस्तीचे कामं युद्ध पातळीवर पेशासनाकडून केले जात आहे. सर्व संबंधित यंत्रणांना शेतीची पंचनामे, बाधित कुटुंबांचे पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे तसेच रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीबाबत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी यावेळी दिल्या.

Leave a Comment