मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका; दरड कोसळल्याने रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुंबई आणि कोकणात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पाऊस आणि कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गोवा येथील पेडणे बोगद्यात दरड कोसळली असून काही एक्स्प्रेस गाड्या मडगाव-लोंडा-मिरज-पुणे- पनवेल- कल्याण मार्गे पुढे काढण्यात आला आहेत. तर काही पनवेल-पुणे-लोंडा-मडगाव मार्गे अशी वळविण्यात आल्या आहेत.

एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्स्प्रेस, राजधानी स्पेशल एक्स्प्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्स्प्रेस या गाड्यां दुसऱ्यामार्गे वळविण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाड्या वळविण्यात आल्यात

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’