विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे.

महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी करण्यात येत आहेत. त्यामध्ये एक ते दीड हजार रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. रविवारी शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ३४ टक्के होता. रिकव्हरी रेट ८0 टक्के आहे. प्रशासनाने रात्रीचा कर्फ्यू लावला. दर आठवड्याला शनिवार, रविवार २४ तास संचारबंदी लावली. अनेक व्यापक उपाययोजना केल्या आहेत. त्यानंतरही सुपर स्प्रेडर रूग्ण महापालिकेला सापडायला तयार नाहीत. विद्यापीठाच्या रमाई येथील कोवीड सेंटरमध्ये घाटीतील बरे होत असलेल्या रूग्णांना ठेवण्यात येत आहे. यशवंत, छत्रपती शाहू महाराज कोवीड सेंटरमधये अनुक्र मे १८0 आणि २00 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आता महापालिकेने नवीन कोवीड केअरसाठी प्रक्रि या सुरू केली आहे. विभागीय क्रीडा संकुल येथे २00 तर देवगिरी बॉईज सेंटर येथे २२५ रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

साठ मंगल कार्यालयांची तपासणी
शहरातील ६0 मंगल कार्यालयांची आतापर्यंत महापालिकेने तपासणी केली आहे. ज्या ठिकाणी सोयी सुविधा जास्त आहेत, तेथे मंगल कार्यालयाचे रूपांतर सीसीसीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

Leave a Comment