सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा,सर्व शासकीय , निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये दिव्यांगांना प्राधान्यबरोबरच रॅम आणि व्हील चेअर,लिफ्टची सोय,स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय करावी, दिव्यांगांना पाच हजार रुपये पेन्शन मिळावी अशा विविध मागण्यांसाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने सातारा येथे आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिव्यांगांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी त्यांनी एकतर सातारा जिल्ह्यातील सर्व अपंगांना रोजगार द्या किंवा भाकरी द्या अथवा इच्छा मरण द्या,” अशी मागणीही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
दिव्यांगांनी यावेळी म्हंटले आहे कि, आजपर्यंत कितीतरी वेळा निवेदन प्रशासनास दिलेली आहेत. मात्र, आजपर्यंत कोणीच दखल घेतलेली नाही. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी दोनवेळचे जेवण द्यावे आम्ही त्यांच्या घरी राहू, असा इशारा दिव्यांगांचे अध्यक्ष अजय पवार यांनी यावेळी दिला.




