हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा 12 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2023) असून सर्वच जण या गोड सणाची आतुरतेने वाट बघत आहेत. खरं तर दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. त्यामुळे याचे महत्वही तितकाच मोठं आहे. दिवाळीच्या निमिताने आपण सर्वच आपलं घर आकर्षक पद्धतीने सजवत असतो. मात्र कमी बजेट मुळे अनेकांना इच्छा असूनही चांगल्या प्रकरे घर सजवता येत नाही. परंतु आता चिंता करू नका, आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामाध्यमातून तुम्ही कमी बजेट मध्ये आकर्षक पद्धतीने घराची सजावट करू शकाल.
1) फुले आणि रंगेबेरंगी दिवे –
दिवाळीत तुम्ही तुमचे घर रंगीबेरंगी दिवे आणि फुलांनी सजवू शकता. दिव्यांशिवाय तर दिवाळी पूर्ण होऊच शकत नाही. त्याच दिव्यांना जर फुलांची साथ मिळाली तर रोषणाई काही औरच पाहायला मिळेल. त्यामुळे तुमच्या घराचा लूक सुद्धा बदलेल आणि घराचे सौंदर्य वाढेल
2) रांगोळी-
कोणताही कार्यक्रम किंवा सण असला कि आपण घरासमोर रांगोळी काढतो. कारण रांगोळी घराचे सौंदर्य वाढवते. घर सजावटी साठी रांगोळी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. दिवाळीनिमित्त तुम्ही तुमच्या घरासमोर, फरशीवर किंवा अंगणात सुंदर अशी रांगोळी काढू शकता. त्यातच जर का तुम्ही रांगोळी च्या सभोवतालीफुलं आणि दिवे ठेवले तर मग सोन्याहुनही पिवळं म्हणता येईल. रांगोळीमुळे घराची शोभा आणखी वाढेल.
3) रंगीत कागदी दिवा-
घराच्या सजावटीसाठी रंगीत कागद वापरता येतो. हे कागदी दिवे तुम्ही बाजारातूनही अगदी कमी पैशात विकत घेऊ शकता. लायटिंग वर कागदाचा दिवा ठेवल्याने घराला इतका जबरदस्त लूक मिळेल कि तुमच्या घरी आलेले पाहुणेही बघून थक्क होतील
4) दिवे आणि मेणबत्त्या-
दिवाळीला सगळ्यांचं घराघरात दिव्यांची आरास मांडली जाते. दिवाळीच्या दिवशी तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी साधे दिवे लावू शकता. याशिवाय तुम्ही रंगीबेरंगी दिवे आणि मेणबत्त्याही खरेदी करू शकता. यामुळे तुमचे खरं खुलून दिसेल.