Diwali Muhurat Trading: : शेअर मार्केट , ट्रेडिंग यांची एक वेगळीच दुनिया आहे. इथे कधी शेअर्स उंचावर जातात तर कधी दणाणून आपटतात. या सगळ्यात गुंतलेला असतो इथला गुंतवणूकदार. भारतात दीपावलीच्या दिवशी ठराविक वेळासाठी मार्केट खुले केलेजाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर संपूर्ण देश शेअर बाजारातील शुभ व्यवहाराची वाट पाहत आहे. असे मानले जाते की ‘मुहूर्त’ किंवा शुभ मुहूर्तावर व्यापार केल्याने (Diwali Muhurat Trading) गुंतवणूकदारांना समृद्धी मिळते.
यंदाच्या वर्षीची तारीख आणि वेळ काय असेल ? याबाबत आता माहिती समोर आली आहे.खरेतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) ने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित केलेल्या विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्राची वेळ जाहीर केली आहे.
काय आहे दिवाळी ट्रेडींग मुहूर्त ? (Diwali Muhurat Trading)
NSE आणि BSE 1 नोव्हेंबर रोजी एक तासाचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र आयोजित करतील. स्टॉक एक्स्चेंजने वेगवेगळ्या परिपत्रकाद्वारे याची घोषणा केली आहे. परिपत्रकात नमूद केले आहे की व्यापार सत्र शुक्रवार, 1 नोव्हेंबर, 2024 रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत होईल.
विशेष ट्रेडिंग विंडो एक तासासाठी खुली केली जाईल
दिवाळीच्या दिवशी नियमित व्यवहारासाठी शेअर बाजार बंद असेल, पण विशेष ट्रेडिंग विंडो संध्याकाळी एक (Diwali Muhurat Trading) तास खुली असेल. एक्स्चेंजने जाहीर केले की प्री-ओपनिंग सत्र संध्याकाळी 5:45 ते 6:00 पर्यंत असेल. मुहूर्ताचा व्यापार हा पारंपारिक प्रतीकात्मक व्यापार आहे. हा एक शुभ दिवस आहे आणि या दिवशी गुंतवणूकदार भाग्यवान वर्षाच्या शुभेच्छा देऊन काही काळ व्यापार करतात.
गेल्या वर्षीसेन्सेक्स 354 अंकांनी वधारला
गेल्या वर्षी च्या बाबतीत सांगायचे झाले तर 12 नोव्हेंबर रोजी, विशेष दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये (Diwali Muhurat Trading) चांगली वाढ झाली होती. सायंकाळी 6.15 ते 7:15 पर्यंत मुहूर्त साधत व्यापारासाठी खुला होता. सेन्सेक्स 354.77 अंकांच्या किंवा 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 65,259.45 वर बंद झाला. निफ्टीही 100.20 अंकांनी वाढून 19,525.55 च्या पातळीवर बंद झाला होता.