हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळीच्या सणाला आपल्याकडे फारच महत्व आहे. हा एक आनंदाचा आणि प्रसन्नतेचा सण म्हणून ओळखला जातो. यावेळी अनेक वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात. एकीकडे दिवाळीसाठी नवीन कपडे, घराची सजावट, डेकोरेशन, फटाके याकडे सर्वजण लक्ष्य घालत असताना दुसरीकडे शेअर बाजारातील मास्टर मात्र मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहत असतात. दिवाळीला शेअर बाजार बंद असला तरी मुहूर्त ट्रेडिंग फक्त एक तासासाठी सुरु केले जाते. मुहूर्त ट्रेडिंग हि एक शुभ वेळ समजली जाते, जिथे BSE किंवा NSE काही काळासाठी गुंतवणूकदार आणि व्यापारी वर्गाला नवीन गुंतवणुका किंवा खरेदी करण्याची परवानगी देते.
शेअर मार्केट मधील तज्ज्ञांच्या मते, मुहूर्त ट्रेडिंग हे पूर्णपणे परंपरेशी जोडलेल आहे. या एक तासाच्या मुहूर्तावर गुंतवणूकदार छोटी गुंतवणूक करून बाजारातील परंपरेचे पालन करतात. लोकांचा असा विश्वास आहे कीमुहूर्त ट्रेडिंग मध्ये स्टॉक खरेदी केल्याने त्यांना वर्षभर भरगोस नफा मिळतो. यंदाच्या वर्षासाठी 12 नोव्हेंबर 2023 हा दिवस मुहूर्त ट्रेडिंग साठी ठरवण्यात आला आहे. ज्याची सुरुवात संध्याकाळी 6Pm वाजता होईल आणि पुढच्या दीड तासासाठी म्हणजेच 7:15Pm मुहूर्त ट्रेडिंग केलं जाईल.
मुहूर्त ट्रेडिंगची प्रक्रिया काय?
दिवाळीच्या दिवशी देशातील स्टोक बाजार बंद असतो,तरीही या खास वेळेला तो पुन्हा खुला केला जातो कारण या वेळेला भरपूर महत्व आहे. BSE आणि NSE या देशातील सर्वात मोठ्या स्टोक एक्सचेंज कंपन्या आहेत ज्यांच्या अंतर्गत हि परंपरा पाळली जाते. इथे मुहूर्ताच्या वेळेचे विभाजन अनेक भागांमध्ये केलं जातं आणि स्टोक्स, डेरीवेतीव्ज याची खरेदी सुरु होते. देवाचं नाव घेऊन अनेक व्यापारी स्टोक्सची कहारेडी विक्री सुरु करतात. आणि आज आपण ऑनलाईन जगात वावरत असल्याने घरबसल्या टेक्नोलोजीच्या सहाय्याने मुहूर्त ट्रेडिंग करता येतं.
ट्रेडिंग किती वाजता सुरू होईल ते पहा
ब्लॉक डील सत्र – 17:45 ते 18:00 वाजता
प्री- ओपन सेशन : 18:00 ते 18:08 वाजता
सामान्य बाजार सत्र : 18:15 ते 19:15 वाजता
कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन : 18:20 वाजता ते 19:05 वाजता
लोडिंग सत्र: 19:25 ते 19:35 वाजता