हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Diwali School Holidays। शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीत शाळांना किती दिवस सुट्ट्या असणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना दिवाळीत १२ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत हि सुट्टी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या तुलनेत यंदा दिवाळीला खूपच कमी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा थोडासा हिरमोड झाला आहे.
16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी- Diwali School Holidays
तसे बघितलं तर याआधी ही सुट्टी जवळपास 21 दिवसांची असायची, म्हणजेच विद्यार्थी सगळा ताण सोडून ३ आठवडे मनसोक्त दिवाळी साजरी करत असायचे .. मात्र यंदा दिवाळीची सुट्टी अवघी 12 दिवस असणार आहे. यंदा 16 ते 27 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात (Diwali School Holidays) आली आहे. पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळीआधी होणार आहे, तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा उन्हाळी सुट्ट्यांआधी होणार आहे. या बाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिवाळीच्या सुट्टयांमुळे काहीसे असमाधान दिसत आहे. कारण दरवर्षीच्या तुलनेते यंदा निम्म्या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये शिक्षकांना देखील त्यानुसार शैक्षणिक नियोजन करावे लागणार आहे.
यंदा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये शाळांना १२९ दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये रविवारचा सुद्धा समावेश आहे. त्यात आता १२ सुट्ट्या दिवाळीत दिल्या जाणार आहे (Diwali School Holidays). शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, ५३ सुट्ट्या या रविवारच्या असणार आहे. सण-उत्सवानिमित्त ६७ सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्षात २२० दिवस अभ्यासाचे असणार आहेत. याशिवाय उन्हाळ्याच्या सु्ट्या देखील किती दिवस असतील हे देखील निश्चत करण्यात आले आहे. हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जवळपास 44 दिवस उन्हाळी सुट्ट्या असणार आहे. याआधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पहिली ते नववीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या. परंतु आता त्या 8 ते 25 एप्रिलपर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता 25 एप्रिल ते 14 जून या कालावधीत शाळांना सुट्टी असणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सुट्ट्यांची माहिती
- दिवाळीची सुट्टी: 16 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर (12 दिवस).
- उन्हाळी सुट्टी: 25 एप्रिलनंतर ते 14 जूनपर्यंत (44 दिवस).
- रविवारच्या सुट्ट्या: 53 दिवस.
- सण-उत्सवाच्या सुट्ट्या: 67 दिवस.
- पहिल्या सत्रातील परीक्षा : दिवाळी सुट्ट्यांपूर्वी
- दुसऱ्या सत्रातील परीक्षा : 8 ते 25 एप्रिलपर्यंत




