यंदा दिवाळी फराळात ट्राय करा कुरकुरीत ‘खजुऱ्या’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पश्चिम महाराष्ट्रात खजुऱ्या हा पदार्थ आवर्जून केला जायचा. दिवाळसोबत चाहूल लागते ती थंडीची. बाजरी उष्ण असल्यानं महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवाळीच्या फराळासाठी बाजरीचा उपयोग करण्यात येतो. खजुऱ्यासुद्धा बाजरीच्या पीठाच्या केल्या जातात.

साहित्य : एक वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ (गव्हाचं पीठ घातलं नाही तरी चालतं) अर्धी वाटी बारीक किसलेला गूळ, वेलची पूड, तीळ आणि तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती: प्रथम बाजरीचं पीठ चाळून घ्यावं. त्या पिठात गव्हाचं पीठसुद्धा चाळून घालावं. थोडी वेलची पूड किंवा जायफळ टाकावं. अर्धी वाटी गूळ थोड्या पाण्यात विरघळून घ्यावा. नंतर ते गुळाचं पाणी आणि तीळ टाकून पीठ चांगलं मळून घ्यावं. पीठ मळल्यानंतर दहा पंधरा मिनिटं झाकून ठेवावं. नंतर त्याची मोठी पोळी किंवा भाकरी लाटून घ्यावी. चाकूनं त्या पोळीच्या चौकोनी वड्या कापाव्यात. आणि त्या वड्या तेलात किंवा तुपात छान तळून घ्याव्यात.

 

Leave a Comment