Wednesday, February 8, 2023

रयत कारखान्याच्या दिवाळी साखरचे सभासद, उत्पादकांना वाटप शुभारंभ

- Advertisement -

कराड | तालुक्यातील शेवाळेवाडी- म्हासोली येथील रयत सहाकारी साखर कारखान्यांच्या सभासद व ऊस उत्पादकांना दिवाळीसाठी टनेज साखर वाटप करण्यास सुरूवात केली आहे. तांबवे फाटा येथे कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या हस्ते साखर वाटपास शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रा. धनाजी काटकर, शिवाजी गायकवाड, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आर. वाय. नलवडे, रयत कारखान्यांचे संचालिका लिलावती पाटील, विश्वास कणसे, श्रीकांत बादल, लक्ष्णण देसाई, जगन्नाथ कणसे, तुकाराम डुबल यांच्यासह सभासद व ऊस उत्पादक उपस्थित होते.

- Advertisement -

अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, ऊस उत्पादक व सभासद यांना कारखान्यामार्फत त्यांच्या घराजवळ साखर उपलब्ध करण्याचा कारखान्याने निर्णय घेतला आहे. कारखान्यांने चालू वर्षी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. येत्या काळात रयत कारखाना सभासदांच्या मदतीने अग्रस्थानी राहील. स्व. विलासराव पाटील काका यांनी सर्वसामान्यांचे हित जपण्यासाठी हा कारखाना उभा केला. पुढील काळातही सामाजिक वसा असाच पुढे चालू ठेवून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी स्वागत केले.