Monday, February 6, 2023

Diwali Wishes in Marathi : तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून दीपावली शुभेच्छा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीपावलीचा सण सर्वत्रच अतिशय उत्साहात साजरा केला जातो. देशभर दीपावलीला आनंदाचे वातावरण असते. दीपावली दिवशी सर्वांना आपल्या प्रियजनांना शुभच्छा संदेश (Diwali Wishes in Marathi) द्यायचे असतात. याकरता आम्ही आपल्या खास मराठीतून काही शुभ दिवाळी संदेश खाली दिलेले आहेत.

 1. पुन्हा एक नवे वर्ष,
  पुन्हा एक नवी आशा,
  तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
  एक नवी दिशा नवे स्वप्न,
  नवे क्षितीज, सोबत माझ्या
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 2. दिपावलीच्या
  आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
  साजरा होत असलेल्या आनंदमयी,
  उत्साही,
  मंगलमय पर्वानिमित्त आपणास
  व आपल्या परिवारास
  मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
 3. उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
  दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
  फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
  नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
  शुभ दीपावली
 4. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
  लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
  सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
  सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 5. स्नेहाचा सुगंध दरवळला,
  आनंदाचा सण आला.
  विनंती आमची परमेश्वराला,
  सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 6. दारी दिव्यांची आरास,
  अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
  आनंद बहरलेला सर्वत्र,
  आणि हर्षलेले मन,
  आला आला दिवाळी सण,
  करा प्रेमाची उधळण..
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Diwali Wishes in Marathi
 7. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
  ली आज पहिली पहाट,
  पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
  उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
  शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
 8. दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार, दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
 9. सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
 10. हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
 11. धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!! (Diwali Wishes in Marathi)