हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DMart तर तुम्हाला माहितीच असेल… सर्व वस्तू एकाच छताखाली देणाऱ्या डीमार्टच्या हजारो शाखा संपूर्ण देशभरात आहेत. प्रत्येक वस्तूंवर डिस्काउंट मिळत असल्याने आणि इतर दुकानांपेक्षा चांगला दर्जाचा माल मिळत असल्याने लाखो ग्राहक डीमार्ट मधूनच खरेदी करण्यास प्राधान्य देत असतात. डी मार्ट मध्ये सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, कपडे, चप्पल, घरगुती उपकरणे, खाद्यपदार्थ, असं सगळं काही मिळत असल्याने ग्राहकांची पसंती कायमच डीमार्ट ला राहिली आहे.
इथे जवळ-जवळ सगळ्याच वस्तू उपलब्ध असतात आणि ते ही एमआरपीपेक्षा कमी किंमतीत… कधीकधी इथे काही वस्तू इतक्या स्वस्त मिळतात की थेट अर्ध्या किंमतीत तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता.. म्हणजेच बय वन गेट वन सारख्या ऑफर सातत्याने असतात. जर तुम्हीही DMart ला जाऊन शॉपिंग करत असाल, महिन्याचा किराणा एकदम भरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे कारण डी मार्ट मध्ये कोणत्या तारखेला सगळ्यात स्वस्त सामान मिळतं याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोणत्या दिवशी मिळतं स्वस्त साहित्य – DMart
DMart मध्ये दररोज अनेक वस्तूंवर डिस्काउंट्स असतात, पण एखादा ठराविक वार किंवा दिवस असा नाही की ज्या दिवशी सर्वच वस्तू स्वस्त मिळतात. DMart चं मॉडेलच असं आहे की ते नेहमीच MRP पेक्षा कमी दरात वस्तू विकतात. पण शनिवार तसेच रविवारी आणि मंडे क्लीन अप सेल मध्ये येथे जास्त वस्तूंवर ऑफर दिली जाते. कारण म्हणजे वीकेंडला सुट्टी असल्याने ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर डीमार्ट ला येत असतो. या काळात FMCG, ग्रोसरी, कपडे, ब्यूटी प्रॉडक्ट्स यावर विशेष ऑफर्स येतात. काही स्टोअर्समध्ये Buy 1 Get 1 Free किंवा बंडल डील्सही दिल्या जातात. त्यामुळे जर तुम्हीही DMart मध्ये शॉपिंगला जाणार असाल तर शनिवारी आणि रविवारी जा म्हणजेच तुम्हाला जास्त वस्तू स्वस्तात खरेदी करता येतील. याशिवाय, उत्सवकाळात – दिवाळी, होळी, नाताळ, नवीन वर्ष यावेळी मात्र इथे अनेक मोठ्या ऑफर्स येतात. या वेळी खरेदी केल्यास अधिक फायदा होतो.