हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यतः जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशमध्ये बदामाची शेती करण्यात येते. परंतु सध्या शेतीतील आधुनिकीकरणामुळे महाराष्ट्रात देखील बदामाची शेती करणे सोपे झाले आहे. बदामाची शेती करून शेतकरी लाखो रुपयांचा नफा मिळवू शकतो. महाराष्ट्रामध्ये बदामाची शेती उत्पादित करण्यासाठी फक्त योग्य हवामान आणि माती असणे गरजेचे आहे.
लागवड कशी करावी?
बदामाची शेती करण्यासाठी कोरडे उष्ण उष्णकटिबंधीय क्षेत्र असणे पूरक आहे. परंतु बदामाचे फळ पिकवण्यासाठी गरम आणि कोरडे हवामान आवश्यक आहे. गरम भागामध्ये बदामाची शेती करता येत नाही. कारण बदामाचे झाड अत्यंत थंडी आणि दव सहन करू शकते. बदामाच्या लागवडीसाठी सुरुवातीला चिकणमाती आणि खोल जमिनीचा वापर करा. त्यानंतर बदामाच्या बिया वापरून रोपवाटिकांमध्ये झाडे लावा. साधारण या बिया डिसेंबर जानेवारी दरम्यान लावा. डिसेंबर महिन्यात जास्त थंडी असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम बदामाच्या झाडांवर होत.
फळे किती येतात?
बदामाच्या झाडांना तीन ते चार वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. परंतु झाडांना चांगले उत्पादन येण्यासाठी किमान सहा वर्षांचा कालावधी निघून जातो यामध्ये दर 7-8 महिन्यांनी बदाम लागतात. या सगळ्या गोष्टी करताना प्रत्येक झाडासाठी 20 किलो सेंद्रिय खत घालणे गरजेचे आहे. बदामाच्या झाडांसाठी भरपूर खताची आवश्यकता असते ही बाब लक्षात ठेवा.
पैसे किती मिळणार?
पाऊस किंवा दुष्काळाच्या काळामध्ये बदामाची फळे काढण्यात जाऊ नये. परंतु सीजन नुसार बदामाची फळे काढल्यानंतर त्या फळांना उन्हात वाळवा. पुढे त्याच्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया करा. तुमचे बदाम चांगले असेल तर त्याला बाजारात देखील तितकाच चांगला भाव मिळेल. सध्या बाजारात बदामाची किंमत 600 ते 1000 रुपये प्रति किलो आहे