आरोग्यमंत्रा ।
आधुनिक जगामध्ये सर्व धकाधकीचे जीवन जगत आहेत. परंतु त्याला आता पर्याय सुद्धा नाही. आहे त्या परिथिमध्ये सुंदर जीवन सर्वांनाच जगायचं असतं. अशावेळी माणूस शारीरिक आणि मानसिक मजबूत असायला हवा. संगणक युगामध्ये वावरत असताना, शारीरिक व्याधी खूप होतात. शरीराचे वेगवेगळे पॉईंट दुखायला लागतात. मग अशावेळी ऑफिसमध्ये मनही लागत नाही. आणि खूप बोअर व्हायला लागते. शरीराचा कंबरेचा भाग हा खूप कळीचा मुद्दा असतो. कंबर दुखायला लागली की, अक्षरशः चिडचिडेपणा वाढतो, कुणाशी बोलू वाटत नाही. अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ध्यानाबरोबर काही कंबरेचे व्यायाम केले तर, यातून सुटका मिळेल व फिटही राहू शकाल…
१) खुर्चीवर किंवा जमिनीवर बसून, मान आणि पाठ ताठ ठेऊन वरच्या बाजूला शरीर तणावे. ३० सेकंड हा व्यायाम ५ ते ६ वेळा करावा.
२) आता, हातांनी गुडघ्यांना धरून वरच्या बाजूला सहन होईल इतकंच सोईनुसार ओढावे. कंबरेला ताण निर्माण होईल. आणि काही काळानंतर कंबर रिलॅक्स होईल. अशा प्रकारे ३ वेळा २० सेकंद हा व्यायाम करावा.
३) उठून उभे रहावे, व एक पाय खुर्चीवर सरळ ठेवावा तर, दुसरा पाय जमिनीवरच राहू द्यावा. दोन्ही पायांमध्ये ९० अंशाचा कोण असावा. आलटून पालटून दोन्ही पायांचा अशाप्रकारे व्यायाम करावा. असे १५ सेकंद ५ वेळा करावे.
४) खाली वाकून पायाचे अंगठे दोन्ही हातांनी धरावेत. स्ट्रेट पोजिशनला रहावे. गुडघे वाकू न देता. हा व्यायाम ५ वेळा करावा, 15 सेकंदासाठी.
५) आता मॅटवर झोपावे आणि हात, पाय सरळ ठेवावेत व अगोदर उजवा पाय वरच्या बाजूला न्यावा आणि डावा पाय खालीच राहू द्यावा. असे १५ सेकंद 5 वेळा करावे. अशाच प्रकारे डाव्या पायासाठीही करावे. जेणेकरुन कंबरेला रिलीफ मिळेbल.
इतर महत्वाचे –
आरोग्यासाठी लाभदायक – गुळपोळी !