पवार साहेब मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? जलीलांचा थेट सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शरद पवार आणि काँग्रेसला मुसलमान फक्त निवडणुकीच्या वेळीच आठवतात का ? असा थेट सवाल औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. खासदार जलील आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच हा प्रश्न मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून विचारतोय असा घणाघात देखील केला.

यावेळी बोलताना खासदार जलील म्हणाले, न्यायालयाने देखील मुस्लिमांना ५ टक्के आरक्षणाची गरज असल्याचे सांगितले आहे. मग तरी तुम्ही त्यासाठी का पुढाकार घेत नाही ? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणावर, ओबीसी आरक्षणावर संसदेत तुम्ही चर्चा करता, त्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे याचे आम्ही पण समर्थन करतो पण मुस्लिमांना देखील आरक्षणाची गरज आहे असे जलील यांनी सांगितले. संसदेत चर्चा करून त्यावर निर्णय घेणे हे खूप सोपे काम आहे तरी पण तुम्ही त्याकडे का लक्स देत नाही अशी सवाल जलील यांनी उपस्थित केला.

तसेच राज्य सरकारने क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवून चूक केलेली आहे. मराठवाडा आपला हा मागासलेला भाग असून क्रीडा विद्यापीठामुळे शहराला व जिल्ह्याला मोठा रोजगार मिळाला असता. असे असतानाही क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार अशी घोषणा इमतियाज जलील यांनी केली.

Leave a Comment