शांत झोप मिळण्यासाठी ‘हे’ करून पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा लोक इतके मोठ्या प्रमाणात काम करून सुद्धा त्यांना शांत झोप लागत नाही अश्या वेळी कोणत्या पद्धतीचा वापर केल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते. शांत झोप मिळण्यासाठी थोडे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. आपले शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य पद्धतीचा आहारा आणि शांत प्रकराची झोप हे गरजचे आहे. त्याबरोबरच व्यायाम पण करणे आवश्यक आहे. परंतु कितीही काम केले तरी शांत झोप लागत नसेल तर अश्या वेळी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया …

— जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.

—पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.

— ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.

  • रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.

— शांत झोप मिळण्यासाठी नियमित अंघोळ करणे गरजेचे आहे. .

—- मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास योगा करावा. त्याने आपल्याला निवांत झोप लागू शकते.

— सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करू नये.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment