मोबाईल पाण्यात भिजला ? चिंता न करता फक्त ‘हे’ काम करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल (Mobile) ही आजकालची अतिशय महत्वाची आणि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. कोणतेही काम मोबाईलच्या माध्यमातून अगदी चुटकीसरशी होत असल्याने प्रत्येकाच्याच हातात आजकाल मोबाईल बघायला मिळतो . मोबाईल वापरत असताना त्याची योग्य जपणूक करणेही तितकंच गरजेचं आहे. सध्याचे दिवस हे पावसाळ्याचे असून प्रवासादरम्यान किंवा बाहेर जाताना पावसाच्या तडाख्यात अनेकदा आपला मोबाईल भिजतो.. कधी कधी स्टंट बाजी मध्ये मोबाईल पाण्यात पडतो. अशावेळी नेमकं काय करायचा असा प्रश्न नक्कीच आपल्या मनात येत असेल. पण घाबरू नका आज आम्ही तुम्हाला यावर उपाय म्हणून काही खास टिप्स सांगणार आहोत.

सर्वप्रथम, जेव्हाही तुमचा मोबाइल पाण्यात पडेल, तेव्हा तो लवकरात लवकर पाण्यातून बाहेर काढा, कारण तुमचा मोबाइल जितका जास्त वेळ पाण्यात राहील, तेवढं जास्त पाणी मोबाईलच्या वेगवेगळ्या भागात शिरण्याची शक्यता असते.

मोबाईलची बटणे सतत दाबण्याची चूक करू नका… असं केल्यास मोबाईलमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मदरबोर्ड खराब होण्य्ची शक्यता असते.

मोबाईल कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसा. मोबाईलच्या स्पीकर मध्ये किंवा इतर भागात पाणी गेलं असल्यास त्याला तांदळाच्या डब्यात कमीत कमी १० तास तरी ठेवा. कारण भातामध्ये ओलावा शोषण्याची क्षमता जास्त असते.त्यामुळे आतील सर्व पाणी आपोपाप निघून जाईल.

जर तुमच्या मोबाईलमध्ये थोडासा ओलावा असेल तर तो सुकण्यासाठी मोबाईल काही काळ उन्हात ठेवा. यानंतर १०-१५ मिनिटात मोबाईल मधील सर्व पाणी निघून जाईल.

मोबाईल भिजल्यानंतर हे सर्व उपाय तर आहेतच, परंतु पावसात आपला मोबाईल भिजूच नये यासाठी खबरदारी घेणं सर्वात महत्वाचे आहे. त्यासाठी मोबाईल प्लास्टिकच्या पिशवीत किंवा पाऊच मध्ये ठेवा, पावसात जास्त भिजू नका. जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका.