नवी दिल्ली । व्याजावरील-व्याज माफी योजने (compound interest waiver) बाबतीत अर्थ मंत्रालयाने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता नाही. त्याऐवजी आपल्या खात्यात पैसे आपोआप ट्रान्सफर केले जातील. यासाठी बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. कर्ज मोरेटोरियमच्या व्याजावरील-व्याज माफ करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
मंत्रालयाने जारी केले होते FAQ
मंगळवारी मंत्रालयातर्फे वारंवार विचारले जाणाऱ्या 20 प्रश्नांसाठी FAQ जारी करण्यात आले. यामध्ये ते ग्राहकांच्या समस्या दूर करण्याच्या प्रश्नावर होते. जेव्हापासून ही योजना सरकारने जाहीर केली तेव्हापासूनच ग्राहकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न चालू होते, त्याचे निरसन करण्यासाठी विभागाने हा FAQ सेट जारी केला होता.
बँका ग्राहकांच्या नावांची लिस्ट तयार करतील
सर्व प्रथम, बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या अशा ग्राहकांची लिस्ट तयार करतील, ज्यांनी या मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेतलेला नाही. याचा अर्थ सरकारी नियमांनुसार त्यांना दिलासा मिळाला पाहिजे. यानंतर बँका 1 मार्च ते 31 ऑगस्ट दरम्यान दिले जाणारे कंपाऊंड इंटरेस्ट आणि साधे व्याज यातील फरक ग्राहकांच्या खात्यात जमा करतील.
कोणाला फायदा होईल?
सरकारच्या या योजनेचा फायदा त्या ग्राहकांना होईल, ज्यांनी मोरेटोरियमची निवड केली नाही. याशिवाय ज्यांच्याकडे दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज आहे. त्यांना 5 नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम ग्राहकांच्या कर्ज खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. नंतर बँका आणि वित्तीय संस्था सरकारकडून या रकमेचा दावा करु शकतात.
कोणत्या लोकांना योजनेचा लाभ मिळणार नाही ?
ज्या लोकांना फेब्रुवारी 2020 पर्यंत कर्जाची ईएमआय भरली असेल त्यांनाच फायदा होईल, ज्यांचे खाते फेब्रुवारीच्या अखेरीस नॉन-परफॉर्मिंग एसेट्स (NPA) म्हणून वर्गीकृत केले गेले आहेत त्यांना याचा लाभ मिळणार नाही. मिळेल. त्याशिवाय फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स आणि बाँडवर घेतलेल्या कर्जावर ही सवलत मिळणार नाही.
या कर्जांवर दिलासा
वित्त मंत्रालयाने व्याजावरील व्याज माफी योजनेबाबत जारी केलेल्या FAQ मध्ये MSME लोन, एजुकेशन लोन, होम लोन, क्रेडिट कार्ड थकबाकी, ऑटो लोन, पर्सनल लोन यावर सवलत देण्यात येईल.
75 टक्के ग्राहकांना याचा फायदा होईल
क्रिसिल या रेटिंग एजन्सीच्या मते, छोट्या कर्जावरील चक्रवाढ व्याज सवलतीत सुमारे 75 टक्के ग्राहकांना फायदा होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.