वाशिंग्टन । पुणेरी टोमणे भल्याभल्यांना खजील व्हायला भाग पाडतात. मग तो जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती का न असो! ही अतिशोयक्ती नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसमध्ये नुकताच घडलेला एक प्रसंग आहे. झालं असं एका पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा थेट प्रश्न विचारला की, व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षातील सर्वचजण चकीत झाले. इतके कि डोनाल्ड ट्रम्प एका क्षणाला अस्वस्थ झाले.
तर झालं असं व्हाइट हाऊसममधील पत्रकार कक्षात एक पत्रकार परिषद भरली होती. पत्रकार डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारात होते. या प्रश्नोत्तरादरम्यान, पुण्यात जन्मलेल्या शिरीष दाते या भारतीय अमेरिकन वंशाच्या एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला. तो असा कि, ”मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चाताप वाटतो का?”.
Here’s the clip: pic.twitter.com/wN3x6LoJ8J
— The Recount (@therecount) August 13, 2020
खोटं बोलणं, खोटे दावे करणे याकरिता अमेरिकन माध्यमांत बऱ्याच वेळा टीकेला सामोरे गेलेल्या ट्रम्प यांना असा काही प्रश्न आपल्याला विचारला जाईल याची कल्पनाही त्यांना नव्हती. त्यांना हा प्रश्न अनपेक्षित होता. त्यांनी दाते यांना पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले. दरम्यान, शिरीष दाते यांच्या या रोखठोक प्रश्नाची सध्या अमिरिकेतचं नव्हे तर जगभर चर्चा होत आहे. यांनतर मागच्या वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता असे टि्वट दाते यांनी केले आहे. शिरीष दाते सध्या हफिंगटन पोस्टसाठी काम करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”