पेशंट महिलेला गुंगीचे औषध देऊन डाॅक्टर बनवायचे अश्लिल व्हिडिओ; त्यानंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दवाखान्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या डॉक्टरला अवधूतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गणेश साठे (रा. छत्रपती सोसायटी, तीन फोटो चौक जुना उमरसरा) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील जुन्या उमरसरा येथे आरोपी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीकडून उमरसरा परिसरात निसर्गोपचार केंद्र चालवले जात होते. त्यांच्या केंद्रात अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असत. मधुमेहाचा त्रास असल्याने एक पिडीत महिला २०१७ मध्ये डॉक्टरच्या नॅचरोपॅथी केंद्रात उपचारासाठी गेली होती. यावेळी तिला सलग बारा महिने उपचार घेतल्यावरच आराम मिळेल, असे डॉक्टरच्या पत्नीने सांगितले.

त्यामुळे पिडीत महिलेने बारा महिने उपचार घेण्यास सुरुवात केली. ज्यावेळी महिला उपचारासाठी त्याठिकाणी जात असे त्यावेळी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केले जात होते.अत्याचार केल्यानंतर संबंधित महिलेचे मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले.

त्यानंतर तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला असता पीडित महिलेने डॉक्टरविरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी डाॅक्टरसह तिच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करीत दोघांनाही अटक केली आहे. सध्या आरोपी डॉक्टर पोलिसांच्या कोठडीत असून त्याच्याकडील मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत.