नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीवर लौंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अखेर अटक

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये स्वतःच्या खाजगी दवाखान्यात कामासाठी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार (sexually abusing) करणाऱ्या डॉक्टराला पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.विकास सुंकरवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात हि घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
किनवट शहराच्या डॉक्टरलेन भागात डॉ.विकास सुंकरवारच्या दवाखान्यात एक अल्पवयीन मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी म्हणून कार्यरत होती. डॉ.सुंकरवार याने सदर मुलीस वेगवेगळी आमिषे दाखवत आणि धमकी देत नोव्हेंबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार (sexually abusing) केल्याचा आरोप पीडित अल्पवयीन मुलीने केला आहे.अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता ही गर्भवती राहिली आहे. काल पीडितेच्या पोटात दुखत असल्याने तिला नातेवाईकांनी शहरातील एका नामांकित दवाखान्यात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी पीडितेची तब्येत पाहून तिच्या काही चाचण्यांसाठी अन्य एका दवाखान्यात पाठविले.

चाचणीपूर्वीच सदर पीडितेचा गर्भपात झाल्याने तिला तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर पीडित मुलीने डॉ.विकास सुंकरवार यानेच आपल्यावर अत्याचार (sexually abusing) करुन हे कुकर्म केल्याचा जबाब इन कॅमेरा पंचासमक्ष नोंदवला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून नराधम डॉ.विकास सुंकरवार याला अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध भादंविच्या कलम 376, पोस्को 4, 6 व इतर वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक घुले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.