पत्नीच्या मृत्यूनंतर डॉक्टर युवतीशी लगट; आरोपीला बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला डॉक्टरचा रुग्णाच्या रुग्णाच्या नातेवाईकाने छेड काढत विनयभंग केला. हा प्रकार 3 ते 22 फेब्रुवारी या काळात शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घडला. कन्हैया वसंतराव टाक असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

कन्हैया टाक याची पत्नी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्यावेळी एक प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर रुग्णसेवा देत होत्या. 8 फेब्रुवारी रोजी टाक याच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना घरी घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा टाक रुग्णालयात आला आणि त्याने त्या महिला डॉक्टरला माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी तुम्ही फार मेहनत घेतली तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे असे सांगून पुढे मनास लज्जा वाटेल अशा भाषेत बोलून निघून गेला. त्यानंतर वारंवार टाक हॉस्पिटलमध्ये येऊन त्या डॉक्टरचा पाठलाग करू लागला. पुढे 20 फेब्रुवारीला टाक याने त्याच्या पत्नीच्या तेरवीच्या कार्यक्रमाची पत्रिका हॉस्पिटलमध्ये अन्य डॉक्टरांना आणून दिली. त्यानंतर त्या महिला डॉक्टरने त्यांच्या सोबत घडलेला प्रकार सुरक्षा एजन्सीचा इंचार्ज गायकवाड आणि डॉक्टर अरविंद गायकवाड यांना सांगितला. तसेच टाक याला हॉस्पिटलमध्ये येऊ देऊ नये अशी विनंती केली. त्यावर सुरक्षा एजन्सीचा इंचार्ज गायकवाड याने उलट त्या महिला डॉक्टरलाच शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या.

पुढे 22 फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास टाक आणि सुरक्षा रक्षक एस. एस. गायकवाड कॅन्सर हॉस्पिटलच्या गेटसमोर खुर्चीवर बसलेले होते. तेव्हा ती महिला डॉक्टर मैत्रिणीसोबत स्कुटीवरून हॉस्पिटलबाहेर पडत असताना टाक याने स्कुटी अडवून पुन्हा त्या महिला डॉक्टरला धमकावत व्हाट्सएपच क्रमांक देण्याची मागणी करू लागला. तसेच अंगलट करण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्या महिला डॉक्टरने सुरक्षा रक्षक गायकवाडला आवाज दिला मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर तेथून त्या महिला डॉक्टर व मैत्रिणीने घाबरून तेथून निघून गेल्या. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिला डॉक्टराने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला कन्हैय्या टाक यांच्या पत्नीवर उपचार सुरू असताना, कन्हैय्या टाक आणि त्यांचा मुलगा हर्षद कन्हैय्या टाक यांनी महिला वॉशरूमध्ये धिंगाणा केला होता. याबाबतही सुरक्षा रक्षकाकडे तक्रार देण्यात आली होती.

Leave a Comment