शस्त्रक्रिया करत असतानाच हार्टअटॅक मुळे डॉक्टरचा मृत्यू

औरंगाबाद : शहरातील जीआय-वन रुगणालयात शस्त्रक्रिया सुरु असताना डॉ दिग्विजय शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्यामुळे ते मृत्यूतूमुखी पडले. स्टेशन रोडवरील जीआय-वन या हॉस्पिटल मध्ये ते फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट म्हणून ते कर्तव्य बजावत होते.

हि घटना शनिवारी दुपारी घडली. एका रुग्णाची अन्न नलिकेची शस्त्रक्रिया ते करत होते. दुर्बिणीद्वारे रुग्णाला तपासात असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला असता. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले तरीही त्यांना यश आले नाही.

दरम्यान, डॉ दिग्विजय शिंदे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी सांगितले कि ते अत्यंत शांत आणि संयमी डॉक्टर होते. त्यांनी स्वतःला रूगनसेवेत २४ तास झोकून दिले होते. त्यांना वाचवण्याचा आम्ही सर्वानी खूप प्रयत्न केला तरी आमच्या हाती अपयश आले.