धक्कादायक| आजारी मुलाचे हाल पाहणे सहन होत नाही म्हणून डॉक्टरची मुलासहित सर्व कुटुंबाला संपवून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर| आपल्या पोटच्या मुलांना मारून नंतर स्वतःही आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार कर्जत तालुक्यातील राशीन येथे घडला आहे. राशीन येथील प्रसिद्ध डॉक्टर यांनी कुटुंबाला संपवून स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलाचे आजारपण सहन होत नसल्याने त्यांनी त्यांची पत्नी, दोन मुलांसह आत्महत्या केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील राशीन या गावी ही घटना घडली. येथील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी त्यांच्या राहत्या घरी दोन मुलांसहीत पत्नीला सलाईन मध्ये विषारी इंजेक्शन देऊन स्वतः नंतर गळफास लावून घेतला. शनिवारी (20 फेब्रुवारी) रोजी पहाटे ही घटना घडली. आत्महत्येचे कारण त्यांनी चिठ्ठी लिहून सांगितले आहेत.

त्यांनी आत्महत्येच्या खोलीच्या दारामध्ये एक चिठ्ठी लिहून अडकवली होती. त्यामध्ये त्यांनी, मुलाचे आजारपण पाहणे मला आणि पत्नीला सहन होत नाही. मुलाचे मन कशात लागत नसून, त्यामुळे ते स्वतः आणि पत्नी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सोबतच, आत्महत्या करणे योग्य नसून या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असे सांगितले आहे. दरम्यान पोलिस या प्रकरणी अजून सखोल चौकशी करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment