जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावानंतर डॉक्टरचे अपहरण; गाडी जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माण | पानवन (ता. माण) येथे अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अपहरण झालेल्या डॉक्टरांचा ठराव घेतल्यानंतर घटना घडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉक्टरांचे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ता. माण) असे अपहरण झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांचा ठराव घेण्यात आला होता. यानंतर डॉ. शिंदे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या घरातून शेतात जात असताना अज्ञात इसमांनी डॉक्टरांचे अपहरण करून त्यांच्या गाडीची जाळपोळ केली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव घेतल्यानंतर ही घटना घडल्यामुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक निलेश सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा????????
Click Here to Join Whatsapp Group

Leave a Comment