डॉ. संजय कुंभार यांना नवरत्न पुरस्कार प्रदान; आरोग्य क्षेत्रातील कार्याची घेतली दखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नवभारत, नवराष्ट्र टाईम्स ग्रुपच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2022 साठी आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन डॉ संजय कुंभार( वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सदाशिवगड) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वितरण शाहू कला मंदीर सातारा येथे हो रविवार दि 27 मार्चला पार पडला.

नवभारत, नवराष्ट्र ग्रुप च्या वतीने चार राज्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध होणारे दैनिक उद्योग समूह यांच्या वतीने नामांकित आणि उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराठी ना रामराजे निंबाळकर सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य, नामदार शुंभूराजे देसाई गृह राज्य मंत्री, मा आमदार शिवेंद्रराजे भोसले सातारा यांचे शुभहस्ते झाले

डॉ. संजय कुंभार हे मूळचे कराड तालुक्यातील काले या गावातील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी जनसेवेचा वसा जपला आहे. कोरोना काळात तर सर्वत्र भीतीचे वातावरण असताना देखील त्यांनी अत्यंत हुशारीने काले परिसरातील अनेक रुग्णांना कोरोनातून बाहेर काढले. सध्या ते सदाशिवगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.