कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र..जे मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं; कोण बरळं पहाच…

डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी : कालिचरण महाराज

सांगली : अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे तर भारतात हे इंजेक्शन का दिले गेले, तसेच नंतर ते पण बंद पण करण्यात आले? कोरोना हे मोदींच्या विरोधातील षडयंत्र होतं. कोरोनाने जे लोक मेले त्यांना डाॅक्टरांनीच मारलं असे कालीचरण महाराज बरळले आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत सरकार गंभीरतेने भुमिका घेत असताना त्यांच्या अशा वक्तव्याने वैद्यकिय सेवा पूरवणार्‍यांकडून त्यांच्या विधानाचा निषेध केला जात आहे.

दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूने जगभरात पाय पसरायला सुरुवात केली असून अनेक देशांमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आहेत. करोनाच्या अन्य उत्पादित विषाणूपेक्षा ओमायक्रॉन अधिक चिंताजनक असल्याबाबत संशोधकांनी मात्र अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. एकीकडे ओमायक्रॉनसंदर्भातील चिंता वाढत असतानाच दुसरीकडे आज सांगलीमध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज यानी करोना हा आजारच पूर्णपणे फर्जीवाडा असल्याचा दावा केलाय. इतकच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी असल्याचंही ते म्हणालेत.

दरम्यान, देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागला आहे. परंतु संपूर्ण देशावर राज्य करायचे असेल तर सर्व हिंदुंनी त्याग केला पाहिजे. सर्व हिंदू एक होवून देशावर हिंदुचे राज्य करण्यासाठी हिंदू व्होट बँक तयार करून देशाचे हिंदूकरण होणे गरजेचे आहे. तसेच कोरोना आणि डब्ल्यूएचओ बोगस असल्याचे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी पत्रकार बैठकीत केले.

You might also like