सरकारचा नवा नियम; कोरोना टेस्टसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आता गरज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी (Corona Test) मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी घेण्यास बराच विलंब होत असल्याचे आयसीएमआरचे म्हटलं आहे.

आयसीएमआरने पुढे लिहिले आहे की, राज्यातील सर्व चाचणी प्रयोगशाळांना (टेस्ट लॅब्स) कोणत्याही वैद्यकीय स्लिपशिवाय चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांकडूनच तपासणी स्लिप घेण्याची गरज नाही. सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही तपासणीस परवानगी देण्याचा अधिकार मिळायला हवा.

अनलॉकनंतर प्रत्येकाच्या मनात कोरोना विषाणूने संक्रमित होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत, केवळ चाचणी करून आपण स्वत:च्या मनातली शंका दूर करू शकतो. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठी (Doctor Prescription) नसेल तर कोरोनाची तपासणी करु शकत नव्हतो. त्यामुळे लोक डॉक्टरांकडे जाण्याचे टाळत असत. मात्र आता आयसीएमआरच्या सूचनेनुसार आता कोणीही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरोना तपासणी करु शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment