ऐकावं ते नवलंच! डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून काढला 30 सेमी लांबीचा जिवंत प्राणी

doctor remove eel from patient stomach
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज-काल अनेक धक्कादायक बातम्या आपल्याला समजत असतात. ज्या बातम्या पाहून किंवा ऐकून आपल्याला विश्वासच बसत नाही की, असं काहीतरी सत्यात झालेले असेल. अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे. ही वाचून तुम्हाला आज धक्का बसणार आहे. ही घटना व्हिएतनामध्ये घडलेली आहे.

एक व्यक्ती पोटदुखीच्या त्रासाने खूप त्रस्त झालेली होती. त्यामुळे त्या पुरुषाला वारंवार जुलाब देखील होत होते. त्या व्यक्तीने सुरुवातीला काही मेडिसिन खाल्ल्या. परंतु अजिबात बरं न वाटल्याने त्याने रुग्णालयात धाव घेतली. त्याला सुरुवातीला असे वाटले की, त्याला अन्नातून विशबाधा झाली असावी. डॉक्टरांनाही तसेच वाटले होते. परंतु औषध उपचार करूनही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा अल्ट्रा साऊंड केला आणि त्याच्या पोटात असे काही दिसले की जे पाहून डॉक्टरांना धक्का बसला होता.

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्या पुरुषाचे वय 34 वर्षे इतके होते. तो मीन प्रांतातील रुग्णालयात आला होता. त्याची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. आणि त्यांनी त्या व्यक्तीचे अल्ट्रासाउंड आणि एक्स-रे केले. त्याच्या रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांना देखील धक्का बसला. त्याच्या पोटात एक प्राणी अडकला होता. त्यानंतर त्या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करून तो प्राणी बाहेर काढण्यात आला आणि तो व्यक्ती आता पूर्णपणे बरा आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीच्या पोटातून तब्बल 30 सेंटीमीटर लांबीचा एक जिवंत येईल प्राणी काढला आहे. अनेक दिवस पोटात राहूनही त्या व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या प्राण्याच्या हालचालीमुळे रुग्णाच्या पोटात वेदना होत होत्या आणि त्याला जखम देखील झाली. त्या प्राण्याने त्या रुग्णाच्या आतड्यात छिद्र केले होते आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव देखील झाला होता. अजून एक-दोन दिवस जर शस्त्रक्रिया केली नसती, तर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता असे डॉक्टरांनी सांगितले.

परंतु हा प्राणी त्या रुग्णाच्या पोटात गेलाच कसा? असा प्रश्न डॉक्टरांना पडला? परंतु चौकशी करूनही रुग्णाला त्याचे काही उत्तर देता आलेले नाही. परंतु यामुळे त्याला आतड्याचा संसर्ग झाला आणि तो बरा करण्यासाठी त्याच्या आतड्यातील नेक्रोटिन रेक्टम हा भाग कापून काढावा लागला.