संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून चिनी घुसखोरीशी निगडीत कागदपत्रं हटवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून हटवण्यात अली आहेत. या कागदपत्रानुसार, चिनी सैनिकांनी मे महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारतीय क्षेत्रावर घुसखोरी केली, हे पहिल्यांदाच अधिकृतरित्या हे स्वीकार करण्यात आलं होतं. संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवरून आता ही कागदपत्रं हटवण्यात आली आहेत. वेबसाइटवरील न्यूज सेक्शनमध्ये मंगळवारपासून ही माहिती दिसत होती. पण आता संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरुन हे पेज गायब आहे. एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नियंत्रण रेषेजवळ चीनची आक्रमकता वाढत चालली आहे. विशेष करून 5 मे २०२० पासून गलवान खोऱ्याजवळ चिनी सैनिकांची आक्रमकता वाढलेली आहे.चीनने १७ – १८ मे रोजी लडाखमध्ये कुंगरांग नाला (हॉटस्प्रिंगच्या उत्तरेत पेट्रोलिंग पॉईंट १५ जवळ), गोगरा (पेट्रोलिंग पॉईंट १७ ए) आणि पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर अतिक्रमण केलं’ असा उल्लेख संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या या कागदपत्रांमध्ये करण्यात आला होता. हा मजकूर वेबसाइटवरील न्यूज सेक्शनमध्ये उपलब्ध होता. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या सैनिक अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचा उल्लेखही होता. पण आताही माहिती हटवण्यात आली आहे.

दरम्यान, 6 जूनला दोन्ही देशाच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कॉर्प्स कमांडर्स स्तराची चर्चा झाली. त्यानंतर १५ जूनला गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. रविवारी भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावरची चर्चा झाली. पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. चीन पँगाँग टीएसओमधून मागे हटायला तयार नाहीय. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलपासून भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते. काही भागातून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. पण अजूनही सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”