आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. या बद्दलत्या जीवनशैलीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झालेला आहे धावपळीच्या जगात लोक सकस आणि ताजे अन्न खाणे विसरून गेलेले आहे. त्यांना फास्ट फूडची सवय लागलेली आहे. परंतु आजकाल निरोगी राहायचे असेल तर आपला आहार देखील तितकाच चांगला असतो खूप गरजेचे असते. आपण जर चांगला आहार घेतला तर पोषक तत्वांची कमतरता भरून निघते. आपण केवळ एकाच पद्धतीचे अन्न खाणे गरजेचे नसते. तर ज्यामध्ये लोह कॅल्शियम जीवनसत्व अशी वेगवेगळी खनिज आहेत. या सगळ्या गोष्टींचे सेवन आहारात करणे खूप गरजेचे आहे. आजकाल अनेक लोकांची असे देखील म्हणणे आहे की, स्वयंपाकाची भांडी असतात ती देखील आपल्या अन्नाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्याची भूमिका निभावतात.
लोक आजकाल स्टील सोडून लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवतात. कारण लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्याने आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. शरीराला योग्य प्रमाणात आयन मिळते. असे अनेकांचे म्हणणे आहे. आता आपण लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने खरंच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो की तोटा होतो हे पाहणार आहोत.
लोखंडी भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे
लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. त्यामुळे ॲनिमियाचा धोका देखील कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास असेल तर तुम्ही लोखंडी भांड्यात शिजवलेले अन्न खा. लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. असे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेले आहे.
आपण जेव्हा लोखंडी भांड्यात अन्न शिजवतो. तेव्हा लोखंड आणि हवेतील ऑक्सिजनची प्रक्रिया होते. आणि आयन ऑक्साईड तयार होते. जे त्या पदार्थात मिळते. हे आयन ऑक्साईड ॲनिमिया सारख्या समस्यावर मात करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक लोक लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवून खातात.
सतत लोखंडी भांड्याचा वापर टाळा
तुम्ही जर सतत लोखंडी भांड्यात त्यांना शिजून खात असाल, तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या आरोग्याला सहन करावे लागते. जर लोखंडी भांड्यात जास्त वेळ ठेवून खाल्ल्याने लोहाची पातळी प्रमाणापेक्षा वाढते. त्यामुळे आपल्या आरोग्याला मोठ्या प्रमाणत धोका निर्माण होतो.