विजेचा शॉक लागून कुत्र्याचा मृत्यू; रस्त्यांवरील वायरींनी घेतला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | सोलापूरातील तरटी नाका परिसरातील गांधी रस्त्यावर सहा महिन्यांपूर्वी उघड्या वायरिंगमुळे एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या वायरी आजही तशाच राहिल्याने एका कुत्र्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झालाय. विजेच्या धक्क्यानंतर वायरींनी पेट घेतला होता आणि तेथे कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सोलापुरात स्मार्ट सिटी योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बाळीवेस या रस्त्याचे काम झाले. यामध्ये मयुर कॉम्प्लेक्स या इमारतीसमोर वीज जोडणीची पेटी आहे. या पेटीच्या बाजूला मोठ-मोठ्या वायरी अजूनही तशाच पडून आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराविरुद्ध रोष व्यक्त करत कारवाईची मागणी करत आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर धास्तावलेल्या नागरिकांनी याबाबत रोष व्यक्त केला. आज या मुक्या प्राण्याचा जीव गेला… अजून किती जीव घेणार आहेत ?? इथे महिला पाणी भरतात उद्या कदाचित माणसाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला. एमएससीबी निर्लज्ज आहे अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Comment